HAPPY FRIENDSHIP DAY

          1533447230536-09dd3f1e-ef1f-463e-b8f2-69f60dca47d8

        मित्र..दोस्त..यार..फ्रेंड अशा कोणत्याही नावानं ‘मैत्री’ या नात्याला संबोधता येत. खरं तर हा पाश्चात्य देशांमधून आलेला हा ‘डे’ आपल्याकडे कधी रुळला हे सांगता येणार नाही; पण आपला इतिहास मात्र या खऱ्या मैत्रीची साक्ष देतो बरं का? अगदी कृष्ण-सुदामा पासून ते बालशिवाजी अन् त्यांचे मावळे सवंगडी या पुरातन व ऐतिहासिक ‘फ्रेंडशिप’ च्या नात्याला आपण कधीही विसरू शकणार नाही. परिस्थिती बदलली…. काळ बदलला; पण ‘मैत्री’ संकल्पना मात्र दिवसेंदिवस अधिक दृढ  होताना दिसून येते. पण एक खरं, खऱ्या मैत्रीला कशाचेही बंधन नसते. जात- पात, धर्म, वंश, भेेद, लिंग या कशाचीही तमान बाळगता सृष्टीतल्या प्रत्येक घटकांबरोबर आपण ‘खरी मैत्री’ करू शकतो. मैत्रीचं हे नातं सिद्ध करण्यासाठी एखाद्या ठरावीक अशा दिवसाची खरं तर गरज नाही. तरीही आपल्या ‘बिझी शेड्युल’ मधून क्षणभर एकमेकांना समजून घेण्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’ एक निमित्त ठरते. किमान त्या निमित्ताने तरी लॉंग ड्राईव्हला जायला आणि फेसाळत्या चहाबरोबर गरमागरम भजी खाताना एकमेकांना जोडता येईल….. सो माय डिअर फ्रेंड्स कम ऑन एंजॉय द फ्रेंडशिप डे….!

Published by Swapnil Wadgave

Engineering Student

Leave a comment